Shahajibapu Patil । “आरं… नुसतं टीव्हीवर दिसून मोठं होत नाही, अजून बायकोला लुगडं कधी घ्यायच याचा विचार करतोय”
Shahajibapu Patil । मुंबई : ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल‘ या डायलॉगमुळे एका रात्रीमध्ये सगळीकडे फेमस झालेले एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची मागणी खूपच वाढली आहे. शहाजीबापू पाटील यांचं डिमांड वाढलं आहे. अनेक ठिकाणी त्यांना भाषण करण्यासाठी बोलावलं जात आहे. अशातच त्यांनी मिळत असलेल्या प्रसिद्धीवर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील
शहाजीबापू पाटील यांनी आपल्या प्रसिद्धी मागचं कारण सांगत, प्रसिद्धी मिळाल्यानंतर दुख: ही सांगितलं आहे. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी भाषणाला का बोलावतात?, याच्या मागचंही कारण पाटलांनी सांगितलं आहे. लोकांना वाटतं बापू मोठा झाला. वनवास संपला. आरं नुसतं टीव्हीवर दिसून मोठा होत नाही. अजून बायकोला लुगडं कधी घ्यायच याचा विचार करतोय, असं म्हणत शहाजीबापू यांनी आपल्या वेदना बोलून दाखवल्या. पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये भाषण करताना शहाजीबापू ( Shahajibapu Patil ) बोलत होते.
आम्हाला भाषणाला बोलावून चेअरमनचे कौतुक करायला सांगायचे आणि ते पवार साहेबांनी एकायचे हा आमचा उद्योग होता, हा किस्साही पाटील यांनी भाषणाच्या वेळी सांगितला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या सारखा माणूस राजकारणात हवा. यांनी राजकारणात आलं पाहिजे. त्यांनी एकतर दरेकर यांच्याकडे यावं किंवा शिंदेंकडे यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच, शहाजीबापू यांनी भाषण करताना शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. या दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं. आमच्या सर्वांची वाट लावली, असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत कोकणात येऊन आम्ही धुरळा पाडणार आहोत. संजय राऊत निवडणूक लढवत नाहीत. नाही तर त्यांच्याही मतदारसंघात गेलो असतो, असं शहाजीबापू ( Shahajibapu Patil ) यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | शिवतीर्थवर खलबतं! राज ठाकरे अन् आशिष शेलारांची भेट, राजकीय चर्चांणा उधाण
- Maruti’s Upcoming Car | लवकरच लाँच होणार मारुतीची ‘ही’ नवीन SUV
- Abdul Sattar | “आम्ही मागितलेली ढाल-तलवार आम्हाला मिळाली अन्…”; अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरे गटावर हल्ला
- Shahajibapu Patil । “…म्हणून उद्धव ठाकरे अन् आमच्यात दरी पडली”; शहाजीबापू यांनी केला खुलासा
- T20 World Cup। पहिल्याच सामन्यात नामिबियाचा आशिया कप चॅम्पियन श्रीलंकेवर मोठा विजय
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.