Shahajibapu Patil | “१९९५ साली अजित पवार कुठे होते?”; जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शहाजीबापू पाटलांचा खोचक सवाल

Shahajibapu Patil |  अहमदनगर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन बंड पुकारत भाजप पक्षासोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते सतत शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप, टीका करत आहेत. तर हे सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचंही बोललं जात आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक वक्तव्य केलं. आमचं अधिवेशन झाल्यानंतर, राज्यातील सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याला शिंदे गटातील शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, “अशी भाकितं यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहेत. १९९५ साली जेव्हा मी पहिल्यांदा काँग्रेसकडून आमदार झालो, तेव्हा ५ वर्षं शरद पवार आम्हाला सांगायचे की पुढच्या महिन्यात सरकार पडणार. पण मनोहर जोशींचं सरकार काही केल्या पडलं नाही. आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागलं. आताही सरकार पडणार असं म्हणत यांच्या पक्षाचे जे लोक शिंदे गट आणि भाजपाकडे निघून चालले आहेत, त्यांना अडवण्यासाठी अशी भीती दाखवणारी विधानं केली जात असल्याचा टोला शहाजीपाबू यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनीही हे सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं होतं. यावर प्रत्युत्तर देत पाटील म्हणाले, “अजित पवार किंवा शरद पवार ही मोठी राजकारणी माणसं आहेत. ९५ सालीही अजित पवारांनी सरकार पाडलं नाही. तेव्हा कुठे गेले होते ते? कुठल्या गावाला गेले होते अजित पवार? पाडायचं होतं की सरकार. त्या वेळी एवढंसं सरकार होतं. शिवसेना-भाजपाच्या १०० जागाही नव्हत्या. ते तुम्हाला पाडता आलं नाही. आता खणखणीत १७५ आमदारांचं बहुमत असलेलं सरकार आहे. ते आता तुम्ही पाडायला लागले आहात. तुम्ही एवढे बुद्धीवान आहात का? उगीच त्यांचे कार्यकर्ते अडवण्यासाठी ते करत आहेत”, असं म्हणत त्यांनी पवारांवर टीका केलीय.

काय म्हणालेत जयंत पाटील? (Jayant Patil)

आमचं अधिवेशन झाल्यानंतर, राज्यातील सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच, आज महाराष्ट्रात सगळ्यात खंबीर पक्ष राष्ट्रवादीच आहे. तो फुटायचा प्रश्नच नाही, असा विश्वासही पाटलांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आपल्याच गावाचा असा पायगुण आहे असं स्वत:च जाहीर करणारे आमचे परमस्नेही खासदार यांचं कौतुक वाटतं, असं म्हणत जयंत पाटील यांनी शिर्डीतील विद्यमान खासदारांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.