InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

‘शहीद भाई कोतवाल’चा ट्रेलर प्रदर्शित

क्रांतिवीरांमधील एक नाव म्हणजे ‘शहीद भाई कोतवाल’. लवकरच त्यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. अभिनेता आशुतोष पत्की हा भाई कोतवाल यांची भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.‘एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग’ असं म्हणत ब्रिटिशांविरोधात निधड्या छातीनं लढणाऱ्या “शहीद भाई कोतवाल” यांच्यावर आधारित चित्रपट २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्चीचा नवा ‘मेकअप’…टीझर प्रदर्शित !

Loading...

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून भाई कोतवाल यांचं मातृभूमीवर असलेलं प्रेम प्रकर्षाने जाणवत आहे.आजपर्यंत स्वातंत्र्य संग्रामातील अनेक व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपट आले. पण काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या भाई कोतवाल यांची शौर्यकथा पहिल्यांदाच चित्रपटातून समोर येत आहे.

‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारला येऊ लागला हृतिकचा राग

- Advertisement -

त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीपासूनच उत्सुकता आहे, त्यात आता या ट्रेलरमुळे हा चित्रपट लक्षवेधी ठरला आहे. हा चित्रपट येत्या२४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

 

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.