Shahid Afridi | ‘या’ माजी खेळाडूने शाहीद आफ्रिदीचा फोटो शेअर करत उडवली खिल्ली

Shahid Afridi | टीम महाराष्ट्र देशा: पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) ला नुकतीच नवी जबाबदारी देण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ राजा यांना हटवण्यात आले आहे. रमीझ राजा यांच्यानंतर नजम सेठी यांनी बोर्डाची जबाबदारी स्वीकारली आहे. नजम सेठी यांनी येतात संघाच्या हंगामी मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी शाहिद आफ्रिदीकडे सोपवली आहे.

शाहिद आफ्रिदीची निवडकर्ता म्हणून निवड झाल्यानंतर दानिश कनेरियाने सोशल मीडियावर आफ्रिदीचा एक फोटो शेअर केला आहे. शाहिद आफ्रिदीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दानिश कनेरियाच्या या पोस्टनंतर असे लक्षात येत आहे की, आफ्रिदीची निवडकर्ता म्हणून निवड झाल्याने काही लोकांचा गट नाखुश आहे. कारण या पोस्टमध्ये दानिश कनेरियाने काहीतरी टोला मारला आहे. दानिश कनेरियाचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दानिश कनेरियाने ट्विटरवर शाहिद आफ्रिदीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने हसण्याच्या इमोजीचा कॅप्शन दिला आहे.
या फोटोमध्ये शाहिद आफ्रिदी चेंडूसोबत छेडछाड करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये हसण्याच्या इमोजीसह दानिश कनेरिया ‘चीफ सिलेक्टर’ असे लिहिले आहे. त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

आफ्रिदी आणि कनेरिया यांचे संबंध खेळण्याच्या दिवसांपासूनच चांगले नव्हते. “तुझ्यामुळे माझे करिअर फार काळ टिकवू शकले नाही.” असे कनेरियाने अनेक वेळा शाहिद आफ्रिदीला टोमणे मारत म्हटले आहे. त्याचबरोबर कनेरियाने शाहिद आफ्रिदीवर आपलं करिअर उध्वस्त केल्याचा आरोपही केला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.