Shahjibapu Patil । अजित दादा माणूस खूप चांगला, पण देवाने त्यांना नरडं लय करंड दिलंय; शहाजीबापूंचा टोला
Shahjibapu Patil । पुणे : आज पुण्यातील सासवड मध्ये शिंदे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या सभेचे आयोजन केले होते. आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठी टीका केली आहे. आजची हि सभा आमदार शहाजीबापू पाटील यांनी गाजवली आहे. यावेळी बोलताना त्यांनी चौफेर टीका केली. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर देखील टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी पाटील म्हणाले कि, सहा महिन्यांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे इनचार्ज द्यायला हवा होता. आदित्य ठाकरे साहेबांनी रात्रंदिवस महाराष्ट्र पिंजून काढायला पाहिजे होता. बघता बघता आम्ही कुठल्या कुठं राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेस ला फेकून दिल असत कळून सुद्धा दिलं नसत. पण झालाच नाही. आमचा अजित दादाच आरडत ओरडत हिंडायला लागला आणि आम्ही टीव्हीला बघत बसलोय. आमचा नेता आम्हाला कुठंच दिसेना झालाय. पण अजित दादांचा घोटाळा काय आहे तर दादा मनाने खूप चांगले आहेत. पण दादाचा घोटाळा देवाने एकच केलाय ओ. दादाला देवाने नरडं लय करंड दिलंय, असं म्हणताच व्यासपीठावर हास्यकल्लोळ उडाला. पुढे त्यांनी दादांच्या आवाजाची नक्कल देखील केली.
दरम्यान, यावेळी शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा बंडा दरम्यानचा किस्सा सांगितला आहे. पाटील म्हणाले कि, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सिल्वर ओकवर होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे अनेक मोठे नेते मुंबईत हजर होते. सगळी पोलीस यंत्रणाही त्या ठिकाणी उपस्थित होती. मात्र आमचे ४० आमदार एक एक करत कधी ठाण्याकडे रवाना झाले हे कुणालाही समजलं नाही. असली यांची यंत्रणा आहे. पेंगत झोपत बसली होती. अन् आम्ही सुरतला पोहचल्यावर हे म्हणायला लागले कि हे कुठं गेले ते बघा. शहाजीबापू पाटील यांचा फोन नॉट रिचेबल. शहाजीबापू फोन वर सापडत नाही. मी माझा बायकोला महिना महिना फोन वर सापडत नाही आणि तुम्हाला कुठं सापडायचो, येड्या का हुडकाय लागलाय, असा टोला शहाजीबापू पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Praniti Shinde | त्यांचे जरी ओके असलं तरी महाराष्ट्रातील जनतेच नॉट ओके – प्रणिती शिंदे
- Shahajibapu Patil | आम्ही एकनाथ शिंदेंना घेऊन गेलो, ते आम्हाला नाही – शहाजीबापू पाटील
- Shahjibapu Patil | “आम्ही मेलेल्या आईचं दूध नाही पिलं, ठोका देणारच”; शहाजीबापूंचा राष्ट्रवादीला इशारा
- Shahjibapu Patil : “मी माझ्या बायकोला महिना-महिना सापडत नाही आणि तुम्हाला…”; शहाजीबापूंचा माविआच्या नेत्यांना टोला
- Alia bhatt | “मी ब्रा का लपवायची?…”; आलिया भट्टच बोल्ड विधान
Comments are closed.