‘चांगले वर्तन कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाहरुख खान’

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणी जेलमध्ये आहे. या प्रकरणानंतर यामध्ये काहीजण आर्यनवर टीका करताना दिसतात तर काहीजण आर्यन खानला समजून घेण्याची भूमिका घेताना दिसतात. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्करस्वरा भास्करने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे.

‘चांगले वर्तन कसे असावे याचे शाहरुख खान एक उदाहरण आहे. माझ्यासाठी, एक आदर्श व्यक्ती म्हणून त्याच्याकडे सर्व गुण आहेत. वैयक्तिकरित्या तो माझ्यासाठी प्रेरणाही आहे. त्याच्यासाठी आणि गौरीसाठी मी प्रार्थना करत आहे’ या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे.

स्वरा भास्करसोबतच अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खानला पाठिंबा दिला होता. आता स्वराने देखील ट्वीट करत पाठिंबा दिला आहे. आर्यन खान आणि इतर आरोपींची पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा