राज कुंद्रा प्रकरणात ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले..

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला म्हणजे राज कुंद्राला पोर्नग्राफी रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आली. यानंतर मात्र राजसोबतच शिल्पा शेट्टीलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यातच ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी शिल्पाच्या बाजुनं मत व्यक्त केले आहे.

मुकेश खन्ना यांचे असे म्हणणे आहे की, “लोकांना तेवढेच माहिती असते की, जेवढे मीडिया त्यांना सांगते. मला राज हा जबाबदार आहे की नाही माहिती नाही, शिल्पा जबाबदार आहे का? हेही माहिती नाही. त्याच्या मुळापर्यंत मला जायचेही नाही. मात्र या प्रकरणात जर स्वतःहून काही माहिती शिल्पानं दिली तर त्यातून सत्य बाहेर येईल असे मला वाटते. जेव्हा सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास सुरु होता. तेव्हा बॉलीवूडमधील एक मोठं स्कँडल समोर आलं होत. अनेक पैलू एखाद्या गोष्टीला असू शकतात, असे मला म्हणायचे आहे. म्हणजे जर शिल्पा यावर काही बोलली तर अनेक गोष्टी समोर येतील.”

मुंबई क्राईम ब्रँचनं राज कुंद्रा आणि त्याच्या इतर 11 साथीदारांना पॉर्न व्हि़डिओ प्रकरणी अटक केली. त्यावरुन सध्या बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. यासगळ्या प्रकरणावर मुकेश शर्मा यांची प्रतिक्रिया अशी आहे की, या प्रकरणात शिल्पाला दोष देणं चूकीचं ठरेल. मात्र त्यात तिच्याकडे काही माहिती असेल तर ती तिनं पोलिसांना द्यावी. जेणेकरुन सत्य काय आहे हे पोलिसांना आणि नागरिकांना कळेल.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा