Shalini Thackeray | ‘कांदे बाई’ उल्लेख करत शालिनी ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांची उडवली खिल्ली

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण गरम होऊ लागलं आहे. त्यातच अंधेरी (पूर्व) निवडणूकीमध्ये निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नवीन नावं आणि चिन्हं दिली आहेत. त्यानंतर ठाकरे गटाने महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून, या यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नेते विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येतं आहे. परंतू या महाप्रबोधन यात्रेत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दिसल्या नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या शालिनी ठाकरे ?

शालिनी ठाकरे यांनी किशोरी पेडणेकर यांचा ‘कांदे बाई’ असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडली आहे. धारात तिर मारणाऱ्या नवं शिवसैनिकांमुळे माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये शालिनी ठाकरे यांनी म्हटलं की, “अंधारात तिर मारणाऱ्या नवं शिवसैनिकांमुळे माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे. महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून त्यांनी प्रमुखांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही.मूळ सैनिक यांच्यावर अन्याय करून उपऱ्याना संधी ही नवीन शिल्लक सेना. अजब आहे.”

दरम्यान, शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह आयोगाकडून गोठवण्यात आल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नावं आणि ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे.तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नावं आणि ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह देण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.