Sharad Pawar Resigns | मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार? काय असेल राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची पायरी असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातं आहेत. अध्यक्षपदासाठी चार लोकांची नावं चर्चेत देखील आहेत. तर जेष्ठ नेत्यांकडून या प्रकरणी प्रतिक्रिया येत असून आताच माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी चर्चेत असणाऱ्या नावांपैकी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर आरोप करत मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे या विषयाला फाटे फुटलेले पाहायला मिळतं आहेत.
अजित पवारांना अध्यक्षपद देणं चुकीचं : शालिनीताई पाटील
माध्यमांशी बोलताना माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, मी देखील राजकारण बघितलं आहे. अजूनही राजकारणात काम करत आहे यामुळे इतकंच सांगेल की शरद पवारांनी जो अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तो देताना त्यांनी अति घाई केली. तसचं शालिनीताईनी पुढे म्हणाल्या, अजित पवार हे घोटाळेबाज आहेत. ते कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात कारण त्यांच्या पाठीशी भाजपच्या मोठ्या नेत्यांचा हात आहे. यामुळे त्यांना अध्यक्षपद देणं राष्ट्रवादी काँग्रेससाठी तोट्याच असेल. असा आरोप शालिनीताईनी केला. म्हणून मला वाटतं सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपद द्यावं.
( Giving president post to Ajit Pawar is wrong: Shalinitai Patil)
दरम्यान, शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांबाबत एक प्रश्न देखील उपस्थित केला की, जर इडी कोणाचीही चौकशी करत असेल तर चौदाशे कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अजित पवारांची इडीकडून चौकशी का होत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी काल पहिली प्रतिक्रिया देत येत्या 6 मे ला सदस्य समितीची बैठक पार पडेल त्यामध्ये जो काही निर्णय घेतला जाईल तो मान्य असल्याचं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या–
- Weather Update | राज्यात मराठवाड्यासह ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
- Sharad Pawar | शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया “या” तारखेला घेणार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण असणार याचा निर्णय
- Rohit Pawar | सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची एकांतात चर्चा; राजकीय वर्तुळात तर्क – वितर्क
- Sanjay Raut VS Nana Patole | नाना पटोलेंना त्यांचा पक्ष गांभीर्याने घेत नाही, मग आपण का घ्यायचं?- संजय राऊत
- Job Opportunity | महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIS) यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज