Shambhuraj Desai | पत्राचाळ घोटाळ्यामध्ये किती खोक्यांचा व्यवहार झाला ; शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना सवाल

Shambhuraj Desai |  नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत केलेल्या वक्तव्यावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. संजय राऊत यांना सकाळी उठलं की 50 खोकेच दिसतात. मागे जे संजय राऊत हे जेल मध्ये गेले होते ते कोणत्या पुण्यकर्मासाठी गेले होते. पत्राचाळ घोटाळ्यामध्ये किती खोक्यांचा व्यवहार झाला याचं उत्तर देखील संजय राऊत यांनी द्यावं. संजय राऊत ज्यांच्यासाठी बोलतात त्यांचा कडे काय चालतं आणि फ्रिज भरून कोणाकडे काय जातं याचा पुनरुच्चार आम्हाला करायला लावू नये, असे देसाई म्हणाले.

दिशा सालियान प्रकरणात नवीन काही गोष्टी शासनाकडे आल्या आहेत त्यावर गोष्टीवर चौकशी होणे गरजेचं आहे. जे अधिकार राज्य सरकारच्या गृहविभागाला आहे. त्याच कक्षेत राहून चौकशी होत आहे, त्यांना भीती नसेल तर त्यांनी चौकशीला समोर जावं, असे देसाई म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत –

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. यावर संजय राऊत म्हणाले, “एसआयटीची स्थापना एका खास प्रकरणासाठी केली आहे. जो खटला बंद आहे. ज्याची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यावर या सरकारला एसआयटी स्थापन करण्याची खाज सुटली आहे. हे सर्व करून राज्य यंत्रणेचा गैरवापर होत आहे. सर्वप्रथम या पोकळ सरकारच्या आमदारांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी. 50-50 कोटी घेऊन ज्या प्रकारे आमदार फोडले गेले आणि सरकार स्थापन झाले, त्यावर एसआयटी स्थापन करण्याची सर्वाधिक गरज आहे.”

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.