Shambhuraj Desai । “…तर यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे डॉक्टर शिंदे साहेब”; शंभूराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना टोला

Shambhuraj Desai | सातारा : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार अस्तित्वात आलं. मात्र यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटात विभागली गेली. यानंतर या दोन्ही गटातील नेत्यांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर ठाकरे यांच्या टीकेला बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेते आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया –

आदित्य ठाकरे यांना आमच्यावर टीका करण्याशिवाय कोणतं काम उरलेलं नाही. आम्ही घोषणा करत नाही तर त्या कृतीमध्ये आणतो. त्या निर्णयाची अंमलबजावणी करतो. आदित्य ठाकरे यांनी फिल्डवर जाऊन पाहणी करावी. सामान्य शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांची चौकशी करावी. आम्ही दिवाळी असताना देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहोत. निकषात नसताना देखील शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करतोय. तुम्हाला जर मळमळत असेल तर यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे डॉक्टर शिंदे साहेब. डॉक्टर शिंदे यांच्या औषधानं तुम्ही बरे व्हालं, अशी जोरदार टीका शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलीय.

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया-

आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा खोक्यावरून शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. खोके कोणाकडे किती पोहोचले यावरून दोन – तीन आमदारांमध्ये आता भांडण सुरू झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. चाळीस गद्दार गेले मात्र नवे सहकारी आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे समाधान वाटत असून, त्यांना घेऊन आम्ही पुढे जात असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

तसेच पुढे ठाकरे म्हणाले कि, हे सरकार अजून राजकारणातच अडकलं आहे, घटनाबाह्य सरकारने कामही करायची असतात, हे त्यांना अजून जाणवले नाही. राज्यात केवळ आश्वासनांवर आश्वासने आणि घोषणांवर घोषणा देणे सुरू आहे, जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही, त्यामुळे या सरकारला ‘घोषणा सरकार’, ‘खोके सरकार’ अशी अनेक नावे मिळाली आहेत. आपण काम करणे गरजेचे आहे, हेही ते विसरून गेले आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.