Shambhuraj Desai । राष्ट्रवादीचे आमदार सोबत येण्यासाठी सकारात्मक, शिंदे गटाचा दावा

Shambhuraj Desai | मुंबई : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल असं वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं होत. यासंदर्भात प्रत्युत्तर देत महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. आमच्या सरकारच्या काळात एकही आमदार किंवा मंत्री नाराज नाही, अजित पवारांच्या वक्तव्यात तथ्य नाही, असं देसाई म्हणालेत. अजित पवार यांचं हे विधान त्यांच्या आमदारांना थोपवण्यासाठी असल्याचं शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

आपल्या आमदारांना थोपवण्यात यावं आणि दुसऱ्या पक्षात जाण्यापासून वाचवण्यासाठी अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असल्याचं देसाई म्हणाले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, शिंदे सरकारवर अनेक आमदार आणि मंत्री नाराज आहेत, त्यामुळे लवकरच हे सरकार पडेल. त्यावर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आमचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांची कामं झाली आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात असून ते आमच्यासोबत येण्यास इच्छुक आहेत.

पाण्याविना जसा मासा तसे सत्तेविना अजित पवार

राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार आम्हाला भेटत राहतात. याची जाणीव अजित पवारांना झाली आहे. त्यामुळे ते सरकार पडेल नाहीतर आपल्या पक्षाचे काही आमदार आमच्या पक्षात येतील, असे सांगून आपल्या आमदारांना दिलासा देत आहेत. ते म्हणाले की, अजित पवार म्हणतात की 145 चा आकडा खाली येताच हे सरकार पडेल. संख्या कमी असेल तर सरकार पडेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आम्हालाही माहीत आहे, पण आमची संख्या कमी होणार नाही तर वाढणार आहे. पाण्याविना जसा मासा तसे सत्तेविना अजित पवार असे समीकरण महाराष्ट्रात झालं असल्याचं सांगत देसाईंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.

सामना पेपर मध्ये फक्त आमच्यावर किंव्हा भाजपवर टीका करणे हेच काम उरलं असल्याचं त्यांनी सांगितलं. पूर्वी बाळासाहेबांचे ज्वलंत विचार ऐकायला मिळायचे आता फक्त टीका करण्याचं काम सामनातून केलं जात असल्याचा आरोप देसाई यांनी यावेळी केला. त्यांच्याकडे फक्त हेच काम उरले आहे म्हणून मी सामनाला जास्त महत्व देत नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.