पक्षानं सांगितले तर जशास तसं उत्तर देऊ, राणेंना विचारपूर्वक शब्द वापरण्याचे शंभुराज देसाईंचा इशारा

मुंबई : नारायण राणे यांनी अलीकडंच कोकणातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. हा दौरा राणेंच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळं गाजत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू आहे. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुख्यमंत्र्यांवर केलेल्या भाष्यावर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

शिवसेना नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण राणे यांना इशारा दिला आहे. राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे की, नारायण राणे यांचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात आहे.

मात्र पक्षानं सांगितले आहे त्यामुळे आम्ही शांत आहोत, पक्षानं जर आदेश दिला तर नारायण राणे यांना जशास तसे उत्तर देऊ असा थेट इशारा राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री यामुळे नारायण राणेंनी शब्द विचारपूर्वक वापरावेत अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा