“लाज वाटली पाहिजे तुम्हाला…”; राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी प्रकरणात राखी सावंतची उडी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अश्लील फिल्म बनवण्याच्या आरोपावरून मुंबई क्राइम ब्रांचने सोमवारी रात्री राज कुंद्रा याला अटक केली. राज कुंद्राला न्यायालयात हजर केल्यानंतर २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या बातमीने बॉलिवूड क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर प्रत्येक जण यावर आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. अशातच बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंतची सुद्धा प्रतिकिया आलीय. या प्रकरणात आपली प्रतिक्रिया देताना राखी सावंतने राज कुंद्राची बाजू घेतली आहे.

राज कुंद्रा यांच्या प्रकरणाविषयी विचारले असता ती म्हणाली, ‘शिल्पा जी इंडस्ट्रीमध्ये इतकी मेहनत घेत आहेत असे तुम्हाला वाटत नाही. कोणीतरी त्याचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना चांगले आयुष्य जगू देऊ नका. कुणीतरी त्याच्या कुटुंबात हस्तक्षेप करून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज कुंद्राजींनी असे काहीतरी केले असते यावर माझा विश्वास नाही. राज कुंद्रा जी एक आदरणीय व्यक्ती आहेत. शिल्पा शेट्टी यांचे पती आहेत. आपण त्यांचा आदर केला पाहिजे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा