“निर्लज्ज बाई, नाही मी पण म्हातारा आहे…”, अफसानावर संतापला सलमान

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’चे १५’ वे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. शोमध्ये असलेली स्पर्धक अफसाना खान तिच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांच्या निशाण्यावर आहे. दरम्यान, सलमान खाननेही अफसानावर टीका केली.

‘बिग बॉस’चा हा प्रोमो कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान अफसानाला खूप ओरडत बोलतो, “निर्लज्ज बाई कोण आहे आणि कोण नाही हे तू ठरवणार?” त्यावर अफसाना बोलते, “तुम्ही मोठे आहात.” अफसानाला मध्ये थांबवत सलमान बोलतो नाही “नाही मी पण म्हातारा आहे.”

इतर स्पर्धकांकडून अफसानाबद्दल ऐकल्यानंतर सलमान बोलतो, “माझी चॉइस असती तर मी तुला या शोमधून काढून टाकलं असतं.” हे ऐकल्यानंतर अफसाना माफी मागण्या ऐवजी बोलते, “मला काहीच अडचण नाही.” हे ऐकल्यानंतर सलमानला राग येतो. आता सलमान पुढे काय करणार? हे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा