InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘शमी मुस्लीम असल्यानं भाजपाच्या दबावामुळे त्याला श्रीलंकेविरुद्ध खेळवलं नाही’

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीसह फिरकीपटू युजवेंद्र चहल यांना विश्रांती दिली होती. त्यांच्या जागी संघात भुवनेश्वर कुमार व रवींद्र जडेजा यांनी स्थान पटकावले होते.या सामन्यात शमीला दिलेली विश्रांती ही पाकिस्तानमधील क्रिकेट तज्ज्ञांना पटलेली नाही. त्यांनी थेट शमी मुस्लीम असल्यानं भाजपाच्या दबावामुळे त्याला विश्रांती देण्यात आली, असा दावा केला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली होती. त्यानंतर पुढील सामन्यात शमीला संधी मिळाली आणि त्यानं चार सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या. शिवाय चेतन शर्मा यांच्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठलला होता. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 40 धावांत 4 विकेट घेतल्या होत्या आणि त्यात अखेरच्या षटकातील हॅटट्रिकचा समावेश आहे. तरीही श्रीलंकेविरुद्ध त्याला बाकावर बसवण्यात आले आणि भुवीचे पुनरागमन झाले.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply