Shamshera Movie | “माझ्या प्रिय शमशेरा…”; दिग्दर्शक करण मल्होत्राने केली भावनिक पोस्ट

महाराष्ट्र देशा डेस्क : चित्रपट निर्माता करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित शमशेरा या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर चालली नाही. हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. या चित्रपटात रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला मिळालेल्या अल्पशा प्रतिसादानंतर आता दिग्दर्शक करणने अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

करणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, “माझ्या प्रिय शमशेरा, तू तितकाच भव्य आणि विलासी आहेस. आताच्या परिस्थितीत या प्लॅटफॉर्मवर स्वतः व्यक्त होणे खूप महत्वाचे आहे. कारण येथे तुझ्यासाठी प्रेम, द्वेष, आनंद आणि अपमान सगळंच पाहायला मिळत आहे. मला माफी मागायची आहे कारण मी हा द्वेष आणि राग हाताळू शकलो नाही. माझी माघार हीच माझी कमजोरी होती आणि त्यासाठी मी कोणतेही कारण देणार नाही. मी तुझ्यासोबत उभा आहे आणि तू माझा आहेस याचा अभिमान वाटत आहे. आपण सर्व गोष्टींचा सामना करू, मग ते चांगले असो वा वाईट. शमशेरा टीमला माझे खूप सारे प्रेम.”

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेक्षकांचा प्रतिसाद नसल्यामुळे या चित्रपटाचे जगभरातील अनेक शो रद्द करण्यात आले आहेत. रणबीरचा हा कमबॅक चित्रपट त्याच्यासाठी आणखी एक फ्लॉप चित्रपट ठरला आहे. रणबीर तब्बल चार वर्षांनंतर ‘शमशेरा’मधून मोठ्या पडद्यावर परतला आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या संजय दत्तच्या बायोपिक ‘संजू’मध्ये तो शेवटचा दिसला होता. मात्र, खराब ओपनिंगनंतरही ‘शमशेरा’ हा रणबीरच्या कारकिर्दीतील सर्वाधिक ओपनिंग करणारा 6वा चित्रपट ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.