शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज!; शरद केळकरने दिले पत्रकाराला उत्तर

बहुप्रतिक्षित ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अजय देवगण तानाजी मालुसरे यांची, सैफ अली खान उदयभानसिंह राठोडची आणि अभिनेता शरद शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.

आज चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजदरम्यान एका महिलेने शरद केळकरला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारला. परंतु हा प्रश्न विचारताना त्या महिलेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ शिवाजी असा एकेरी उल्लेख केला. त्यावर शरद केळकरने तिला रोखत छ्त्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केला. शरदच्या या उत्तराने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटासह एकच जल्लोष केला. शरद केळकरच्या या उत्तराचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. शिवप्रेमी शरद केळकरवर कौतुकाचा वर्षाव करु लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.