sharad koli | …नाहीतर तुला शिवसैनिक फाडतील; शरद कोळी यांचा नितेश राणेंना थेट इशारा

sharad koli | सोलापूर : भाजप आमदार नितेश राणे ( Nitesh Rane) हे उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका- टिपण्णी करत असल्याचे पाहायला मिळते. संजय राऊत आणि नितेश राणे ( Nitesh Rane) यांच्यात शाब्दिक मतभेद, आरोप सातत्याने करत असल्याचं बघायला मिळतं. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांचा बॅनर झळकत होता. त्यावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. याचं टीकेला आता ठाकरे गटाचे युवा सेना नेते शरद कोळी ( Sharad Koli) यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

शरद कोळी (Sharad Koli) म्हणाले की, जी माणसं आणि कुत्री पिसाळलेली असतात तीच इतरांची कपडे फाडतात. त्यामुळे विचार करून नितेश राणे ( Nitesh Rane) यांनी बोलावं. “तू कपडे फाडायचा सुद्धा विचार करू नका, नाहीतर शिवसैनिक तुला फाडतील”.अशा शब्दात नितेश राणेंना (Nitesh Rane) शरद कोळी ( Sharad Koli) यांनी इशारा दिला आहे. तसचं नितेश राणे तू म्हणतो ते बरोबर आहे, की आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) सरपंच होण्याच्या योग्यतेचे नाहीत, कारण आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान होण्याच्या योग्यतेचे आहेत. यामुळे तुझ्या जर पोटात आता तो बॅनर बघून आग पडली का? असा सवाल देखील शरद कोळी (Sharad Koli) यांनी उपस्थित केला आहे.

sharad koli Commented On Nitesh Rane

दरम्यान, तुझी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) बोलायची लायकी नाही कारण तुला कोणी गणपतीच्या मंडळाचा सदस्य देखील बनवणार नाही. असं देखील शरद कोळी ( Sharad Koli) म्हणाले. तर नितेश राणे ( Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेबद्दल म्हटल होत की, आम्ही त्याचे टराटरा कपडे फाडू. जे काही बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणू लावण्यात आले आहेत त्या आदित्य ठाकरेला (Aditya Thackeray) शिल्लक सेनेत सरपंच पद तरी मिळेल का? अशा शब्दात नितेश राणे ( Nitesh Rane) टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43l24qo

You might also like

Comments are closed.