Sharad Pawar | अजित पवारांना पक्षप्रमुख बनवण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही – शरद पवार
Sharad Pawar | बारामती: काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठं वक्तव्य केलं होतं. मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत पद द्या, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख नेमण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “पक्षाचा पक्षप्रमुख नेमण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. अजित पवार यांना जर पक्षप्रमुख करायचं असेल तर पक्षातील प्रमुख लोक त्यांच्यासोबत बसून हा निर्णय घेतील. पक्षातील प्रमुख लोकांची बैठक होईल आणि मग संबंधित निर्णय होईल.”
Everyone wants to work for party and organization – Sharad Pawar
पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “पक्षासाठी आणि संघटनेसाठी काम करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळं अजित पवारांनी काही वेगळं केलेलं नाही. पक्षासाठी काम करायच्या भावनेनं अजित पवारांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. ”
दरम्यान, 21 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Sharad Pawar) मेळावा पार पडला होता. मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. जवळपास मी एक वर्षापासून ही जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे आता मला यातून मुक्त करा आणि संघटनेत जबाबदारी द्या”, असं या मेळाव्यात अजित पवार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- Jasprit Bumrah | “जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची घाई नको, अन्यथा…”; रवी शास्त्री यांची प्रतिक्रिया
- PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना प्रत्येकी 4000 रुपये
- IND vs WI | उमरान मलिकला पुन्हा मिळाली टीम इंडियात जागा! वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
- Sanjay Shirsat | अजित पवारांना प्रमुख करणं हे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना परवडणार नाही – संजय शिरसाट
- IND vs WI | वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळालं कसोटी संघात स्थान
Original NEWS SOURCE – https://bit.ly/46m9LyU
Comments are closed.