Sharad Pawar | अज्ञान आणि इतिहास माहीत नसल्यानं फडणवीस असं बोलतात – शरद पवार

Sharad Pawar | बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली तर ती बेईमानी आणि शरद पवार करता ती मुत्सद्देगिरी, असं कसं चालेल?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

BJP was with us when we formed the government – Sharad Pawar

शरद पवार म्हणाले, “मी कधी बेईमानी केली? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं. जेव्हा 1977 मध्ये आम्ही सरकार बनवलं होतं तेव्हा भारतीय जनता पक्ष आमच्या सोबत होता. भाजप नेते उत्तमराव पाटील आमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस प्राथमिक शाळेत असतील. म्हणून त्यांना पूर्वी काय घडलं? हे माहीत नसेल.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “मी जे सरकार बनवलं होतं ते सर्वांना सोबत घेऊन बनवलं होतं. देवेंद्र फडणवीस तेव्हा लहान होते. पूर्वीचा इतिहास त्यांना माहीत नाही. त्यामुळं अज्ञानापोटी ते असं वक्तव्य करतात. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर यापेक्षा जास्त मला काही बोलण्याची गरज नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसींना फक्त नावासाठी पद देतो, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देत शरद पवार म्हणाले, “छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर मधुकर पिचड प्रदेशाध्यक्ष झाले. ही लोकं कोण होती? हे सर्व ओबीसी नेते आहेत. संपूर्ण माहिती न घेता देवेंद्र फडणवीस बोलत असतात. यावरून त्यांचं वाचन किती आहे, हे कळतं.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Xrxeun