Sharad Pawar | आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी! नवी दिल्लीत आज होणार NCP ची बैठक

Sharad Pawar | नवी दिल्ली: आगामी निवडणुकींसाठी सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहे. अशात आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

नवी दिल्लीत आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil) इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत. दुपारी 03 वाजता या बैठकीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. भाजप विरोधातील आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

The NCP meeting will be held at the Constitutional Club in Delhi

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशनल क्लबला ही बैठक पार पडणार आहे. शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीची कार्यकारी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (Sharad Pawar) कार्यकारी बैठक होणार आहे. त्यांच्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या बैठकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/435at0F