Sharad Pawar | आजारी असताना देखील शरद पवार शिर्डीतील सभेत पाच मिनिटे बोलले

Sharad Pawar | शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची तब्बेत बिघडली असल्यामुळे त्यांना उपचारासाठी कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजारी असताना देखील शरद पवार पक्षाच्या शिर्डीमधील (Shirdi) मंथन मेळाव्याला उपस्थित राहिले होते.

काय म्हणाले शरद पवार (Sharad Pawar)

मेळाव्यादरम्यान शरद पवार यांनी भाषण देखील केलं असल्याचं समजतं आहे. पवारांनी आजच्या सभेत फक्त पाचच मिनिटं भाषण केलं. कदाचित सभेत केवळ पाच मिनिटं भाषण करण्याची पवारांची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे. तसेच प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी अधिक संवाद साधला नाही. परंतू त्यांचं लिखित भाषण राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं.

शरद पवार हे थेट ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन शिर्डीतील पक्षाच्या मेळाव्याला आले. यावेळी त्यांनी काही नेत्यांची भाषणं ऐकली. नंतर समारोपाचं भाषण अवघ्या पाच मिनिटात उरकलं घेतलं. त्याचबरोबर आज सविस्तर बोलणं शक्य नाही. वैद्यकीय अधिकाऱ्याने 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मला माझं काम करता येईल. तेव्हा मी बोलेन, असं शरद पवार यांनी सांगितलं.

तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल असी आशा आहे, असंही पवारांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.