Sharad Pawar | कमिटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Sharad Pawar Update | मुंबई : आज (5 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP)निवड समितीची बैठक पार पडली. या निवड समितीमधील नेते उपस्थित होते. तर बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत. NCP चे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल ( Praful Patel) यांनी माध्यमांशी संवाद साधत कमिटीच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आला याबाबत माहिती दिली.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ( What did Praful Patel say)
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांनी समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत संवाद साधला त्यावेळी पटेल म्हणाले की, देशाला, राज्याला आणि पक्षाला शरद पवार साहेबांची गरज आहे. यामुळे निवड समिती शरद पवारांनी दिलेला राजीनाम एकमताने नामंजूर करत आहोत. तसचं त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, अशी विनंती आम्ही या निवेदनात केली आहे. हा निर्णय आम्ही त्यांना कळवणार आहोत. याचप्रमाणे शरद पवार साहेबांचा वेळ घेऊन आम्ही त्यांची भेट घेणार आहोत.
दरम्यान, पुढे प्रफुल्ल पटेल म्हणाले की, जेव्हा त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी आमच्यापैकी एकालाही याबाबत कल्पना दिली नाही यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांना राजीनामा माघारी घ्यावा अशी विनंती देखील केली होती. परंतु त्यांनी त्याचवेळी समितीची स्थापना करून येत्या काही दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं होतं. या समितीची जबाबदारी माझ्यावर दिली असल्याने आम्ही आज बैठक घेऊन एकमताने हा ठराव केला आहे.असं देखील प्रफुल्ल पटेल. यामुळे आता पुढे समितीच्या निवेदनानंतर शरद पवार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Sharad Pawar | कार्यकर्ते आक्रमक! शरद पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली
- Chhagan Bhujbal | पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार नाही राहिले, तर आम्ही उपोषणाला बसू – छगन भुजबळ
- Sharad Pawar | मोठी बातमी! निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला
- Ajit Pawar | ‘देश का नेता कैसा हो..’ ; अजित पवारांच्या एन्ट्रीवर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
- Govt Job Opportunity | शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
Comments are closed.