Sharad Pawar | कार्यकर्ते आक्रमक! शरद पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तीन दिवस झाले आहे. या राजीनाम्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पवारांच्या या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आज महत्त्वाची बैठक झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असताना कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

निवड समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला (The selection committee rejected Sharad Pawar’s resignation)

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच व्हावे, असा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीत मांडला आहे. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव या बैठकीत मांडण्यात आला आहे. आता शरद पवार (Sharad Pawar) काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवार समितीचा निर्णय मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मांडले आहे. पहिला म्हणजे पवारांचा राजीनामा मंजूर करण्याचा आणि दुसरा पवारांनी पुन्हा अध्यक्ष व्हायचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. निवड समितीने एकमताने शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा फेटाळला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.