Sharad Pawar | खोटं बोला पण रेटून बोला हे धोरण देवेंद्र फडणवीस कधी सोडणार? राष्ट्रवादीचा फडणवीसांना खडा सवाल

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंगापूर येथे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर हे नाव शरद पवार यांना मान्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं  ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये शरद पवारांचं (Sharad Pawar) छत्रपती संभाजीनगर शहराच्या नावाबाबतचं वक्तव्य आहे. “समृद्धी महामार्गवरून आम्ही औरंगाबादला आलो. छत्रपती संभाजीनगर म्हणतो कारण मला वाद वाढवायचा नाही”, असं वक्तव्य शरद पवार यांनी या व्हिडिओमध्ये केलं आहे.” यावरून राष्ट्रवादीनं देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.

“खोटं बोला पण रेटून बोला हे धोरण देवेंद्र फडणवीस कधी सोडणार? जाहीर व्यासपीठावरून वारंवार पवार साहेबांबद्दल अपप्रचार करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे जे प्रयत्न फडणवीस यांनी चालवले आहेत त्यातूनच ‘पवार’ नावाच्या पॉवरची त्यांना किती भीती वाटते हे ते दाखवून देत आहेत”, असं ट्विट राष्ट्रवादीनं (Sharad Pawar) केलं आहे.

Sharad Pawar does not accept the name Chhatrapati Sambhajinagar – Sharad Pawar 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार (Sharad Pawar) यांना छत्रपती संभाजीनगर हे नाव मान्य नाही. ते म्हणतात तुम्ही नाव काहीही ठेवा मी औरंगाबादच म्हणेल.” देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीनं देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NuXyzn