Sharad Pawar | “जो काही निर्णय मी…” ; निवृत्ती घोषणेनंतर पवारांचं सूचक विधान

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी निराश झाले आहे. कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्षित केलं जाणार नाही, असं सांगत शरद पवारांनी सूचक विधान केलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “मी जो काही निर्णय घेतला आहे तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला आहे. भविष्यात पक्षाचं कामकाज सुरळीत चालावं त्यातून एक नवीन नेतृत्व मजबूत करावं, हा माझा हेतू आहे. हा निर्णय घेताना मी तुम्हाला विश्वासात घेण्याची गरज होती. मात्र, ते माझ्याकडून झालं नाही.”

पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “महाराष्ट्र बाहेरून जे लोक आले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, मी संध्याकाळी बैठक घेणार आहे. त्यानंतर एक ते दोन दिवसात अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाही.”

दरम्यान, ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या आत्मचरित्रामध्ये शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) दोनदा टीका करण्यात आली आहे. “पवारांना मी सल्ला कसा देऊ? मी त्यांना सल्ला देणारा कोण? त्यांना माझा निर्णय पचला नाही तर मी काय करू?” असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.