Sharad Pawar | “…तरच पुढची चर्चा होऊ शकते”, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचे खडेबोल

Sharad Pawar | मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांना खडेबोल सुनावले आहेत. यावेळी शरद पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह पवारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला आहे.

यावेळी, तुम्ही बेळगाव, कारवार आणि निपाणी सोडत असाल तरच पुढची चर्चा होऊ शकते, असं पवार म्हणाले. तिथल्या मुख्यमंत्र्यांना काही गावं हवी आहेत, त्या गावांचं काय म्हणणं हे सांगू शकत नाही, पण बेळगाव, कारवार, निपाणी ही गावं कर्नाटक सोडत असतील तर त्यांना काय देता येईल याची चर्चा होऊ शकते, पण काही न करता कशाची तरी मागणी करणं त्याला आमचा कुणाचा पाठिंबा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

याबाबत बोलताना, केंद्रात भाजपचं राज्य असून इथे भाजपच्या पाठिंब्याचं राज्य आहे, त्यामुळे असंतोष वाढला आहे, काहीही मागा, काहीही मागण्या करा, कशीही भूमिका घ्या असं सुरू आहे. पण या प्रकरणात देशातील सत्तते बसलेल्या भाजपलाही जबाबदारी टाळता येणार नाही, असा घणाघात यावेळी पवारांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.