Sharad Pawar | “तुमच्या संघर्षाला यश मिळालंय, आता जोमानं तयारीला लागा”- शरद पवार
Sharad Pawar | मुंबई : पुण्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. विद्यार्थ्यांच्या पुण्यातील या आंदोलनाची दखल घेत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची राजकीय नेत्यांनी भेट घेतली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेतली होती.
शरद पवाराचं ट्वीट
“तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.
तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!#MPSC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 23, 2023
शरद पवारांनी दिलं होतं विद्यार्थ्यांना आश्वासन
शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भेट घेतली होती,याबाबत विद्यार्थ्यांना अश्वासनही देण्यात आले होते. त्यानंतर आज विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे असे ट्विट एमपीएसीन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्वीट
राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होईल, अशा स्वरूपाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार, असं ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होईल, अशा स्वरूपाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. #MPSC https://t.co/JisKHRXbXI
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 23, 2023
महत्वाच्या बातम्या-
- #MPSC | विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू
- Devendra Fadnavis | “संजय राऊत दुर्दैवाने एका पक्षाचे…”; देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
- Shivsena | उद्धव ठाकरेंनी राजीनामा नव्हता द्यायचा?; ठाकरेंच्या याच चुकीबाबत सरन्यायाधीशांचं मोठं वक्तव्य
- Abhijeet Bichukale | “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सुनेला म्हणजेच माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा, मग बघा…”
- Supriya Sule | भावी मुख्यमंत्री कोण? ‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; केली कारवाईची मागणी
Comments are closed.