Sharad Pawar | “त्यांना आताच कसं सुचलं?”; पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Sharad Pawar | कोल्हापूर :  पुणे शरहातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपकडून विरोधी पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचे एकमत झालेले नाही.

या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्र लिहिणार असल्याचे म्हणाले होते. यावरुन शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या संदर्भात कोल्हापूर उत्तर आणि पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची उदाहरणे देताना पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूकीबाबत वक्तव्य केले आहे.

चंद्रकांत पाटील पत्र लिहिणार असल्याचे म्हटले होते, यावर शरद पवार म्हणाले की, “ते कोणाला पत्र लिहिणार आहेत, या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही. कोल्हापूरमध्ये देखील पोटनिवडणूक झाली होती ना? पंढरपूरला देखील झाली होती. त्यामुळे आता पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे यांना आत्ताच कसं सुचलं कळत नाही. त्यामुळे एकंदरीत पाहता कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा लढवण्याचे महाविकास आघाडी लढणार आहेत”, असे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.

दरम्यान, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून त्यांच्या घरातील एकाला उमेदवारी देत चिंचवड आणि कसबा या पोटनिवडणुका बिनविरोध लढाव्या अशी भाजपची भूमिका आहे. त्यातच भाजपकडून याबाबत कोणतेही एकमत न झाल्याने विरोधी पक्षाकडून या निवडणुकीची तयारी केली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार की चुरशीची लढाई पाहायला मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.