Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस यांनी इतर वक्तव्य करण्यापेक्षा महिला संरक्षणाचे उपाय करावे – शरद पवार

Sharad Pawar | पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019 मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पहाटेची शपथविधीचा प्लॅन झाला होता. मी आणि अजित पवार या योजनेला पुढे घेऊन जाणार हे देखील या बैठकीत ठरलं होतं. त्या हिशोबानं आम्ही सगळी तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी शरद पवार मागे सरकले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis should focus on the safety of women rather than making other statements – Sharad Pawar

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “राज्यामध्ये महिला सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये महिलांचं गायब होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. महिलांवर होणारा अत्याचार वाढत आहे. 23 जानेवारी ते 23 मे या कालावधीमध्ये राज्यातून हजारो महिला गायब झाल्या आहे. पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर या जिल्ह्यातून महिला गायब झाल्या आहे. त्यामुळं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर वक्तव्य करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावं.

पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “भाजप सत्तेत आल्यावर राष्ट्रवादी भाजपला बाहेरून पाठिंबा देईल, असं मी जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र, तसं झालं नाही. शपथविधी होण्याच्या दोन दिवस आधी मी बदललो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, माझं मत बदलल्यानंतरही त्यांनी शपथ का घेतली? हा शपथविधी त्यांनी चोरून केला होता. आमचा या शपथविधीला पाठिंबा असता तर ते सरकार राहिला असतं. परंतु, ते सरकार दोन दिवसात कोसळलं.”

“देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी काहीही करू शकतात. पहाटेच्या शपथविधी झाल्यानंतर दोन दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली आहे. स्वतःची विकेट गेलेला माणूस विकेट कशी गेली हे सांगत आहे”, असही ते (Sharad Pawar) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43UTxv3