Sharad Pawar | “पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान फक्त साहेबच करू शकतात”, शरद पवार स्वतः ऊभे राहिले व त्यांना सन्मानाने बसवलं
Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना राजकरणात वेगळीच ओळख आहे. कोणी त्यांना किंगमेकर म्हणतं, तर कोणी चाणाक्य. एवढंच नाही तर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच त्यांचा आणखीन एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्याचा सन्मान केला आहे.
शरद पवारांनी काल पुरंदर दौरा केला. यावेळी त्यांच्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पुरंदर तालुक्याचे युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी शरद पवार साहेब यांना कार्यालयात घेऊन आले. त्यानंतर त्यांनी खुर्चीवर बसण्याची विनंती केली. पण शरद पवार म्हणाले की, ‘ऑफिस तुमचं, खुर्ची तुमची’ स्वतः ऊभे राहिले व त्यांना स्वतः सन्मानाने खुर्चीवर बसवले असा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला ‘पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान फक्त साहेबच करू शकतात’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.
दरम्यान, पुरंदर तालुक्याचे युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी आदरणीय श्री.शरद पवार साहेब यांना कार्यालयात घेऊन आले! व खुर्चीवर बसण्याची विनंती केली. साहेब म्हणाले ‘ऑफिस तुमचं, खुर्ची तुमची’ स्वतः ऊभे राहिले व त्यांना स्वतः सन्मानाने बसवले. पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान फक्त साहेबच करू शकतात, असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Soler Eclipse | आज वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचा ‘या’ राशीवर होणार आहे सर्वाधिक प्रभाव
- Chandrakant Patil | “उद्धव ठाकरेंनी स्वत:चं हसं करून घेतलं!”; चंद्रकांत पाटलांची टीका
- Chandrakant Patil | “उद्धव ठाकरेंचं गणित बहुतेक कच्चं आहे, आता ते…”, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Vicky Koushal & Katrina Kaif | पहिल्या दिवाळी निमीत्त विकी कौशलने कतरीनाला म्हटलं ‘घरची लक्ष्मी’ अन्…; पाहा विकी – कतरीनाची दिवाळी
- Sushma Andhare | ” शरद पवार शरद पवार मेथीच्या लाडूसारखे तर राज ठाकरे…”, सुषमा अंधारेंनी नेत्यांना दिल्या फराळांच्या उपमा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.