Sharad Pawar | पवारांनी म्हटलं महाविकास आघाडी टिकणार याचा अर्थ मविआ तुटणार; शिवसेना नेत्याचा खोचक टोला
Sharad Pawar | छत्रपती संभाजीनगर: शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं, असं शिवसेना नेते संजय शिरसाठ म्हणाले आहे. महाविकास आघाडी टिकणार असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं. पवारांनी म्हटलं टिकणार म्हणजेच महाविकास आघाडी तुटणार, असं संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) म्हणाले आहे.
काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना महाविकास आघाडी बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत पवार म्हणाले होते, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सोबत आहे. त्यावर संजय शिरसाठ यांनी पवार म्हणाले टिकणार म्हणजेच महाविकास आघाडी तुटणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलत असताना शिरसाठ यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “संजय राऊत राजकारणातला घाणेरडा किडा आहे. त्यांना त्यांची जागा नाना पटोले यांनी दाखवून दिली आहे. त्यांना आता फक्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जोडे मारायचं बाकी ठेवलं आहे.”
संजय शिरसाठ यांचं अजित पवारांवर टीकास्त्र (Sanjay Shirsath’s criticism of Ajit Pawar)
अजित पवार त्यांच्या पक्षाला सांभाळत होते, ते आम्हाला निधी देत नव्हते. मी एकदा त्यांना निधी मागायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षाचे नाही, असं म्हणतं संजय शिरसाठ यांनी अजित पवारांवर टीकास्त्र चालवलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | शरद पवारांनी राजीनामा मागे घेऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले – जयंत पाटील
- Kangana Ranaut । कंगना रानौतचा दिलदारपणा; नुकसान भरपाईसाठीचे करदात्यांचे पैसे नाकारले
- Ajit Pawar | “ही सगळी नाटकं सुरू आहेत, अजित पवार भाजपसोबत येणार नाही” ; भाजप खासदाराचं स्पष्टीकरण
- Viral Video | धावत्या ट्रेनमध्ये शॉर्ट स्कॅट घालून तरुणींचा धिंगाणा डान्स
- Kangana Ranaut | “देशाला गरज असेल तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल” – कंगना रानौत
Comments are closed.