Sharad Pawar | “बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर…”; पवारांनी सांगितलं भाजपच्या पराभवाचं कारण
Sharad Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवर बोलताना खासदार गिरीश बापट आणि टिळक कुटुंबाचा उल्लेख करत सूचक वक्तव्य केलं आहे. सोमवारी रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) भेटायला आले असताना पत्रकारांशी बोलताना शरद पवारांना भाजपच्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
“बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर…”
“शेवटी शेवटी एक गोष्ट लक्षात आली की, गिरीश बापट यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याबाबत कुजबुज ऐकायला मिळाली. याचा अर्थ गिरीश बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर त्याचे परिणाम होतील, अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल, अशी शंका होती,” असं सांगत शरद पवारांचं सूचक वक्तव्य केलं आहे.
Sharad Pawar criticize on BJP
“मात्र, निवडणूक झाल्यावर जी माहिती मिळाली ती म्हणजे ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ती व्यक्ती वर्षोनुवर्षे कशाचीही अपेक्षा न करता लोकांमध्ये काम करणारी होती. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा असा उमेदवार आहे जो कधीच चारचाकी गाडीत बसत नाही. हा दोनचाकी गाडीवर फिरतो. त्यामुळे दोन पाय असणाऱ्या सर्व मतदारांचं लक्ष या उमेदवाराकडे आहे. त्याचा फायदा होईल, असं ऐकायला मिळालं. ते 100 टक्के खरं ठरलं,” असंही शरद पवार म्हणाले आहेत.
Sharad Pawar talk about Girish Bapat
“गिरीश बापट यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र, पुण्यातील भाजप सोडून इतर सर्वांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे साहजिकपणे ज्या मतदारसंघात त्यांचे लक्ष केंद्रित होते तो मतदारसंघ हा आपल्याला जड जाईल, असं आम्हाला वाटत होतं.”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
Sharad Pawar talk about Ravindra Dhangekar
“याच्या खोलात जायची गरज नाही. परंतु हा भाजपचा गड आहे, असं अनेक वर्षे बोललं जातं. दुसरी गोष्ट तिथं अनेक वर्षे गिरीश बापटांनी प्रतिनिधित्व केलं होतं. बापट सतत लोकांमध्ये मिसळून राहणारे नेते आहेत. कसबा निवडणुकीतील यशाचं सूत्रं काय हे खरंतर रवींद्र धंगेकर यांनीच सांगितलं पाहिजे. धंगेकरांना यश मिळेल, असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं, पण मला स्वतःला खात्री नव्हती. त्याचं मुख्य कारण म्हणजे नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Uddhav Thackeray | “भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नाही”; उध्दव ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका
- Deepak Kesarkar | “मग तुमची बारामतीची सीट जाईल असं म्हणू का?”; पवारांच्या वक्तव्यावर केसरकरांचा सवाल
- Ramdas Kadam | “हा तर चिपळूनचा लांडगा”; भास्कर जाधवांच्या ‘त्या’ टीकेला रामदास कदमांचं प्रत्युत्तर
- Sharad Pawar | “शहाण्या माणसाबद्दल प्रश्न विचारा”; चंद्रकांत पाटलांचं नाव घेताच शरद पवारांची जहरी टीका
- Job Opportunity | बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Comments are closed.