Sharad Pawar | बायको NCP कार्यकर्त्यासोबत पळून गेल्यामुळे शरद पवारांना धमकी, आरोपीचा धक्कादायक खुलासा

Sharad Pawar |  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नारायण कुमार सोनी या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. नारायणकुमार सोनी हे गेल्या अनेक महिन्यांपासून शरद पवार यांच्या निवासस्थानी असलेल्या सिल्व्हर ओक येथे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. दरम्यान त्याने पोलिसांसमोर खुलासा केला आहे.

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी शरद पवार यांच्यावर रागावला होता कारण त्याची पत्नी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत पळून गेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे त्याने थेट शरद पवार यांना धमकी दिली. नारायण सोनी (४५) याला मंगळवारी पाटणा येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा बिहारमधून अटक करण्यात आलेल्या ४६ वर्षीय नारायण सोनी याची पत्नी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत पळून गेल्याने संतापला होता. शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे आरोपीने थेट त्यांना धमकी दिली. आरोपी नारायण सोनी याला बुधवारी मुंबईत आणून न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी नारायण सोनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी फोन करत होता. आरोपी खालच्या भाषेत बोलत होता. मात्र यावेळी त्याने शरद पवार यांनी ‘मुंबई आके देसी कटे से उडा दूंगा’, अशी धमकी दिली. त्यामुळे आरोपी विरोधात 294 आणि 506-2 (गुन्हेगारी धमकी) यासह संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.