Sharad Pawar | भाजप आमदाराकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; सभागृहात गदारोळ
Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उद्देशून भाषण केल्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुते चांगलेच संतापले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख केला आहे. सभागृहात विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
राम सातपुतेंचं वक्तव्य
‘मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले म्हणून मी विधानसभेत निवडून आलो, मला राष्ट्रवादीच्या शरद पवाराने आरक्षण दिले नाही’, असे वक्तव्य राम सातपुते यांनी केल्यानंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
‘जितेंद्र आव्हाड मला दलित आमदार म्हणून हिनवत आहेत. हो मी दलित आहे, मी हिंदू दलित आहे. माझ्या बापाने चपला शिवल्या, त्याचा मला अभिमान आहे. मी सनातन हिंदू धर्मात जन्म घेतलाय, त्याचा मला अभिमान आहे. मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे. मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण दिलं नाही,’ असा उल्लेख राम सातपुते यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Ravindra Dhangekar | “कसबा भाजपचा बालेकिल्ला नव्हताच”; नविर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
- Ajit Pawar | “..मग लोक न बोलता जिथं बटण दाबायचं तिथं दाबतात”; अजित पवारांनी भाजपला डिवचलं
- Kasba ByElection | भाजपला ‘ती’ चूक भोवली; टिळक कुटुंबात उमेदवारी दिली असती तर कदाचित…
- Ravindra Dhangekar Win | भाजपच्या हातून कसबा निसटलंच; महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांचा मोठा विजय
- Kasba Bypoll Election Result | “लोकांनी पैसे घेतले पण मत ह्रदयातल्या धंगेकरला दिलंय”; रवींद्र धंगेकरांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.