Sharad Pawar | माणुसकी शिवाय तुमचा गौरव व्यर्थ आहे; मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय दंगली घडत आहे. यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. घटनेवरून शरद पवारांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं आहे.

मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली आहे. त्यानंतर त्यांनी या महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

It is heartbreaking to see the ugly scene of violence against women in Manipur – Sharad Pawar

शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य लिहत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विट करत शरद पवार म्हणाले, “माणुसकी शिवाय तुमचा गौरव व्यर्थ आहे.

मणिपूरमध्ये झालेल्या महिलांवरील अत्याचाराचे विद्रूप दृश्य पाहून मन दुखावले आहे. हीच वेळ आहे संघटित होण्याची आपला आवाज उठवण्याची आणि मणिपूरच्या लोकांसाठी न्याय मागण्याची. मणिपूरची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान कार्यालयासह गृह विभागाने तातडीने कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.”

दरम्यान, मणिपूर येथील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. 04 मे 2023 रोजी ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांकडून अज्ञाताविरोधात सामूहिक बलात्कार, अपहरण आणि त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर देशात सर्वत्र खळबळ उडाली (Sharad Pawar) आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3DF2wFn