Sharad Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा आदेश मान्य करावाच लागतो; शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सामना अग्रलेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवर देखील शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.

भाजपमध्ये आदेश देण्याची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य करावाच लागतो, असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. आम्ही काम करतो, भाजपला टीका करू द्या, आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा विस्तार करू, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मी राजीनामा मागे घेतला होता. आम्ही पक्षात काय करतो याबद्दल त्यांना माहित नाही. आम्ही काय काम करतो आणि कुणाला किती संधी देतो याबद्दल जाहीर करत नाही. त्यामुळे आमच्यावर कुणीही टीका केली तर आम्ही दुर्लक्ष करतो. अध्यक्ष पदाचा राजीनामा आणि पक्षातील घडामोडी हा आमचा घरचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही, असं म्हणतं पवारांनी (Sharad Pawar) राऊतांवर निशाणा साधला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला होता. शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे कार्यकर्त्यांवर बोलू नये, असं म्हणत बावनकुळे यांनी पवारांवर टीकास्त्र चालवलं होतं. त्यावर उत्तर देत पवार म्हणाले, “जबाबदार पदांवरील व्यक्ती असं वक्तव्य करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करावं लागतं.”

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.