Sharad Pawar | मोठी बातमी! निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला
Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये पवारांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. कारण पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच व्हावे, असा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीत मांडला आहे. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव या बैठकीत मांडण्यात आला आहे. आता शरद पवार काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवार समितीचा निर्णय मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मांडले आहे. पहिला म्हणजे पवारांचा राजीनामा मंजूर करण्याचा आणि दुसरा पवारांनी पुन्हा अध्यक्ष व्हायचा. निवड समितीने एकमताने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे.
दरम्यान, अजित पवार बैठकीसाठी पक्ष कार्यालयात दाखल होत असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती. ‘देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. यावर अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते सरळ पक्षाच्या कार्यालयात निघून गेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | मोठी बातमी! निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला
- Ajit Pawar | ‘देश का नेता कैसा हो..’ ; अजित पवारांच्या एन्ट्रीवर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
- Govt Job Opportunity | शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
- Sharad Pawar Resignation | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष; तर “या” नेत्यांची समितीच्या बैठकीमध्ये उपस्थिती
- Sharad Pawar Resign | पवारांनी लोकसभेपर्यंत तरी थांबावे; ‘या’ प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी व्यक्त केली इच्छा
Comments are closed.