Sharad Pawar | “राज्यपालांची हकालपट्टी करा, नाहीतर…”; शरद पवार यांचा इशारा काय?

Sharad Pawar | मुंबई : महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत (Mumbai) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबाबत भाजपाला सुनावलं आहे.

शरद पवार म्हणाले, “आपण आज महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण एकत्र आलो आहोत. ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे. महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. शिवाजी महाराज यांचं नावं आज साडे तीनशे वर्ष झाले तरी नावं अखंड आहे. त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे.”

“राज्यपालांनी जर माफी मागितली नाही तर हा तरुण शांत बसणार नाही”, असा इशाराही शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल मी कधीही पाहिला नाही. मला विधान भवनात जाऊन 55 वर्षे झाली अनेक राज्यपाल मी पाहिले. तत्कालीन राज्यपालांनी महाराष्ट्राच नावं लौकिक वाढवण्याचे काम केले. मात्र, हे राज्यपाल सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.”

महात्मा ज्योतिबा फुले यांच बिहार उत्तर प्रदेश, दक्षिणेत आदराने नाव घेतलं जाते आणि अशा महापुरुषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा. अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय रहाणार नाही असा इशारा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.