Sharad Pawar | “राज्यातील मराठा नेते शरद पवारांनीच संपवले”, ‘या’ नेत्याचा पवारांवर गंभीर आरोप

Sharad Pawar | मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या विस्तारासाठी माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी एका सभेत बोलताना पवारांच्याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ईस्टइंडिया कंपनी व्यवहार करत करत अख्या देशावर कब्जा करून लंडनला निघून गेली. आणि महाराष्ट्रात पवार कंपनी आली. बारामती, इंदापूर तालुक्यातील साखर कारखाने काकडे, शेम्बेकर, जाचक यांनी मोठ्या मेहनतीने उभारले. मात्र सत्ता आणि पैशाच्या जोरावर कारखाने ताब्यात घेतले. सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचारातून जमवलेल्या पैशातून निवडणुका जिंकायच्या, असा घणाघात विजय शिवतारे यांनी केला आहे.

माझी लढाई परिवाराशी नसून प्रवृत्तीची आहे. जनतेची इच्छा असेल आणि सर्व पक्षांनी सांगितले तर राष्ट्रवादीच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यास केव्हाही तयार असल्याचेही शिवतारे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री कोणीही झालं तरी बारामती सत्ता केंद्र बाहेर पडलं नाही पाहिजे, कोणी ऐकत नसेल तर दुसऱ्याचं नाव सुचवलं जातं, त्यामुळे सर्व हाजी हाजी करतात. मात्र खऱ्या अर्थाने हे सत्ता केंद्र कोणी हलवलं असेल आणि पहिल्यांदा कोणी चेकमेट केले असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, असा खोचक टोला शिवतारेंनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.