Sharad Pawar | राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जातात; शरद पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Sharad Pawar | छत्रपती संभाजीनगर: राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यामध्ये जाणीवपूर्वक धार्मिक दंगली घडून आणल्या जातात, असा गंभीर आरोप शरद पवारांनी राज्य सरकारवर केला आहे.
Religious disputes are increasing in the country
आज संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “सध्या देशामध्ये धार्मिक वाद वाढत चालले आहे. व्यक्तिगत कारणांमुळे समाजावर हल्लाबोल करणे अत्यंत चुकीचे आहे. मुस्लिम समाजाकडून चुका होतात तशा हिंदूकडूनही होऊ शकतात. देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माबद्दल काळजी वाटावी, अशी सध्या त्यांची परिस्थिती आहे.”
पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “समाजाला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर कोणत्याही घटकाला मागे ठेवून चालत नाही. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक धर्मांमध्ये आणि समाजामध्ये भेदभाव निर्माण करतात. देशातील जनतेनं एकत्र येऊन याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे.
“राज्यामध्ये सातत्याने दंगली होत आहे. या सर्व दंगली धार्मिक कारणामुळे होत असल्यामुळे हा विषय चिंतेचा आहे. या धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात आहे”, असा आरोप शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Social Media | धक्कादायक! मामानं मुलगी देण्यास नकार दिल्यानं भाच्यानं केलं सोशल मीडियावर ‘हे’ कांड
- WTC Final | आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपणार? रोहित शर्माच्या प्रतिनिधित्वाखाली टीम इंडिया होणार का वर्ल्ड चॅम्पियन?
- Weather Update | अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सक्रिय, मान्सूनवर काय होणार परिणाम? जाणून घ्या
- Rain Update | नागरिकांनो सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
- UPI Payment | सावधान! यूपीआय पेमेंट फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी करा फॉलो ‘या’ टिप्स
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Ph5siv
Comments are closed.