Sharad Pawar | राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांची निवड करणार ‘ही’ समिती, पाहा सदस्यांची नावं

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पवारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावर कोण विराजमान होईल?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीतील संभाव्य सदस्यांची नावे पवारांनी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के के शर्मा, पी सी चाको, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, हसन मुश्रीफ, धीरज शर्मा, फौजीया खान आणि सोनिया दुहन यांचा समावेश असू शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (2 मे) पार पडले. या पुस्तकातून शरद पवार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे. ते आता कोणतीही निवडणूक लढणार नाही, त्याचबरोबर राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. त्यांच्या या खुलासानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आज बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) राजकीय आठवणींमध्ये गुंग झाले होते. ते म्हणाले, ”1967 साली मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी विविध पदांवर काम केलीत. तेव्हापासून राजकारणात मी आहे. यानंतर आता फक्त तीन वर्ष मी राजकारणात राहणार आहे.” पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या