Sharad Pawar | राष्ट्रवादीला मोठा धक्का! पवारांच्या ‘या’ खास नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अशोक टेकवडे उद्या (16 मे) भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. टेकवडे 2004 ते 2009 दरम्यान पुरंदर हवेलीचे आमदार होते. टेकवडे यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण भाजपाकडून राष्ट्रवादीचा गड जिंकण्यासाठी ‘मिशन बारामती’ आखण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून कंबर कसून तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बारामतीवर मात करण्यासाठी भाजपाकडून मिशन बारामती आखण्यात आलं आहे. अशोक टेकवडे यांचा भाजपमध्ये होणारा प्रवेश हे भाजपचे मिशन बारामतीचं पहिलं पाऊल आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अशोक टेकवडे राष्ट्रवादीत नाराज होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये जास्त काळ राहणार नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. अखेर या नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला पुरंदरमध्ये मोठं बळ मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची अवस्था सरदारासारखी; नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
- Sanjay Raut | हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीसांना आवाहन
- Devendra Fadnavis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची ‘ती’ मागणी मान्य करणार का?
- Karnataka Election | “कर्नाटकमध्ये विजय मिळाला असता तर श्रेय मोदींनी…” ; सामना अग्रलेखातून भाजपवर खोचक टीका
- Weather Update | तापमानाचा पारा 40 पार, तर आणखी पाच दिवस होणार उन्हाचा त्रास
Comments are closed.