Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवारांनी ज्येष्ठ नेत्यांना दिल्या ‘या’ सूचना

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पवारांनी आमदारांना काही सूचना दिल्या आहे. त्याचबरोबर या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी राज्यातील आणि देशातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नेत्यांना काही सूचना दिल्या आहेत.

“आपल्याला महाविकास आघाडी भक्कम ठेवायची आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतूनच लढवायच्या आहे”, अशा सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या वाटेवर असलेल्या नेत्यांना दिल्या आहे. त्याचबरोबर ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याची जबाबदारी पक्षातील काही नेत्यांवर देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी एकनाथ खडसे, कोकणाची जबाबदारी सुनील तटकरे, तर ठाणे आणि पालघरची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

“महाविकास आघाडीत राहूनच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवायची आहे. कर्नाटकमध्ये जो ट्रेंड आहे तोच महाराष्ट्रात आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप नको. त्यांची सत्ता राज्यात येऊ नये, असा मतदारांनी कौल दिला आहे. बहुतांश लोक भाजपच्या विरोधात आहे. जो पक्ष भाजपसोबत जाईल त्याला पराभवाला सामोरे जावे लागेल”, असं देखील शरद पवार या बैठकीमध्ये म्हणाले.

महत्वाच्या बातम्या