Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावूक झाले आहे. पवारांनी आपला हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती देखील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के के शर्मा, पी सी चाको, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, हसन मुश्रीफ, धीरज शर्मा, फौजीया खान सोनिया दुहन यांचा समावेश असू शकतो.
‘या’ नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू (The name of ‘these’ leaders is being discussed)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने चार नावं समोर आली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील या नावांची चर्चा सुरू आहे.
आज बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) राजकीय आठवणींमध्ये गुंग झाले होते. ते म्हणाले, “आमचं घराणं काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षांच्या विचारांचं होतं. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमध्ये आम्ही काँग्रेसच्या जवळ आलो. त्याचबरोबर मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो होतो. त्यानंतर मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झालो.” पुढे बोलताना ते म्हणाले, ” 1967 साली मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी विविध पदांवर काम केलीत. तेव्हापासून राजकारणात मी आहे. यानंतर आता फक्त तीन वर्ष मी राजकारणात राहणार आहे.” पवारांच्या (Sharad Pawar) या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची सहमती नव्हती; पवारांच्या आत्मकथेतून मोठा खुलासा
- Ajit Pawar | सुप्रिया तू बोलू नकोस, तुझा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतो- अजित पवार
- Sanjay Raut | शरद पवारांच्या निवृत्तीवर संजय राऊतांचं भाष्य ; म्हणाले…
- Ajit Pawar | शरद पवारांच्या निर्णयाला फक्त अजित पवारांचा पाठिंबा, म्हणाले…
- Chhagan Bhujbal | ”तुमचा राजीनामा आम्ही नामंजूर करतो” : छगन भुजबळ