Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र
Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत फूट पडलेले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट तयार झाले आहेत.
अजित पवार गटाने राष्ट्रवादीच्या पक्ष आणि नावावर दावा ठोकला होता. आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत असं देखील अजित पवार गटानं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.
Sharad Pawar has asked Election Commission for time to prove that we are nationalists
शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खरे अध्यक्ष शरद पवार आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
त्याचबरोबर आम्हीच राष्ट्रवादी हे सिद्ध करण्यासाठी पवारांनी निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला आहे. शरद पवार यांच्या या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप आणि शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा (Sharad Pawar) राजकीय वर्तुळात सुरू आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार यांच्या दररोज बैठका सुरू आहे.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटाची बैठक सुरू होती. ही बैठक सुरू असताना शिंदेंच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले.
शिंदे गटाच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क (Sharad Pawar) लावले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार? राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
- Balasaheb Thorat | “काहीतरी शिजत आहे, याचा वास…”; अजित पवारांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान
- Nitesh Rane | आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात – नितेश राणे
- Uddhav Thackeray | ठाकरे-शिंदे पुन्हा येणार आमने-सामने! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा मेळावा
- Rohit Pawar | महिलांची सुरक्षा करता येत नसेल तर सरकारला क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – रोहित पवार
Original NEWS SOURCE – https://bit.ly/46NmH0Y
Comments are closed.