Sharad Pawar | विरोधी पक्षांच्या बैठकीला निघताना शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Sharad Pawar | पुणे: आज (23 जुन) बिहार राज्यातील पाटणा येथे सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील हजेरी लावणार आहे. शरद पवार पुण्यातून या बैठकीसाठी निघाले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आजच्या बैठकीत देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

In today’s meeting we will discuss important issues – Sharad Pawar

आज होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत 2024 ची रणनीती ठरणार आहे का? असा प्रश्न शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारण्यात आला होता. त्याचं उत्तर देतं शरद पवार म्हणाले, “आजच्या बैठकीत आम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. मणिपूर राज्यात लोक रस्त्यावर उतरले आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, त्या ठिकाणी हे सर्व प्रकार घडत आहे. त्यामुळे हे सर्व कोण करत आहे, हे स्पष्ट होतं आहे. या घटना देशाच्या दृष्टीनं योग्य नाही. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन पुढची लाईन ठरवणार आहोत.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “या बैठकीला काँग्रेस नेते देखील उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर इतर राज्यातील अनेक बडे नेते देखील येणार आहेत. इतर राज्यातील नेते काही मुद्दे उपस्थित करू शकतात.”

दरम्यान, आजच्या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Jv4ScW