Sharad Pawar | विरोधी पक्षाच्या बैठकीला शरद पवारांची अनुपस्थिती, अचानक का केला दौरा रद्द?

Sharad Pawar | मुंबई: आज आणि उद्या (17 जुलै आणि 18 जुलै) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये काँग्रेसनं ही दुसरी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जवळपास 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या वेळी बिहारच्या पाटणा शहरात विरोधी पक्षाची बैठक पार पडली होती. या बैठकीला शरद पवारांसह (Sharad Pawar) राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. मात्र, आजच्या होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला शरद पवार जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवारांनी अचानक या बैठकीचा दौरा रद्द केला आहे.

Sharad Pawar will stay in Mumbai today

विरोधी पक्षाच्या बैठकीला न जाता शरद पवार (Sharad Pawar) आज मुंबईतच थांबणार आहे. मुंबईमध्ये शरद पवार गटाची बैठक पार पडणार आहे. शरद पवार आज मुंबईमध्ये आपल्या आमदारांची भेट घेणार आहे. त्यांच्या या बैठकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, विरोधी एकजूटीचे सर्वात मोठे नेते म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र, त्यांच्याच पक्षात बंड झाल्याचं दिसून आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना सोडून भाजप-शिंदे सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3DekBts