Sharad Pawar | शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय मागे…पण, अजित पवार कुठे आहेत?

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. पवारांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे, अशी विनंती समितीने केली आहे. या विनंतीला मान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार नॉट रिचेबल (Ajit Pawar Not Reachable)

शरद पवारांची ही पत्रकार परिषद सुरू असताना अजित पवार नॉट रिचेबल होते. या पत्रकार परिषदेला पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, अजित पवारांचा कुठे पत्ता नव्हता. त्यामुळे शरद पवारांच्या या निर्णयावर अजित पवार नाखुश आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आज निवड समितीने शरद पवारांच्या राजीनामा नामंजूर केल्यानंतर अजित पवार काहीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले. काहीही न बोलता निघून गेल्यावर अजित पवार (Ajit Pawar) निवड समितीच्या निर्णयावर नाराज आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शरद पवारांचे निर्णयाला फक्त अजित पवारांचा पाठिंबा ( Ajit Pawar supports Sharad Pawar’s decision)

शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फक्त अजित पवार त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे दिसून आलं होतं. अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या